Thane : ठाण्यात आढळला दुर्मिळ (नाईटजार) रातवा; अशक्त रातवाला पॉज संस्थेने दिले जीवनदान

हा उडतांना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात.
Thane : ठाण्यात आढळला दुर्मिळ (नाईटजार) रातवा; अशक्त रातवाला पॉज संस्थेने दिले जीवनदान
Updated on

Thane - हे पक्षी निशाचर त्यात स्थलांतर करणारे असल्याने सहजपणे हे दिसून येत नाही. पॉज संस्थेच्या संस्थापिका अनुराधा रामास्वामी यांना रातवा हा पक्षी अशक्त अवस्थेत आढळून आला. त्यांनी रातवाला पकडून निलेश भणगे यांच्याकडे उपचारासाठी पाठवून दिले. रातवा याच्यावर उपचार करून त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आल्याची माहिती निलेश यांनी दिली आहे.

Thane : ठाण्यात आढळला दुर्मिळ (नाईटजार) रातवा; अशक्त रातवाला पॉज संस्थेने दिले जीवनदान
Mumbai News : मुंबईत राज्याच्या पोलीस दलाची अर्धवार्षिक परिषद संपन्न... मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अत्यंत दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या रातवा (नाईटजार) या पक्ष्याला पॉज संस्थेने जीवनदान दिले आहे.पॉज या प्राणी संस्थेच्या संस्थापिका अनुराधा रामास्वामी यांना खारीगाव येथे दुर्मिळ रातवा म्हणजे भारतीय नाईटजार पक्षी अशक्त अवस्थेत आढळला.

त्यांनी तातडीने कोणताही विलंब न करता सुखरूप पकडले.त्यानंतर या पक्ष्याला निलेश भणगे यांच्याकडे उपचारासाठी सोपविण्यात आले आणि त्याच्या उपचार करुंन निलेश यांनी त्याची सुटका केली आहे.

याबाबत प्राणी मित्र निलेश भणगे यांनी सांगितले की या पक्ष्याचे दर्शन होणे हा अत्यंत दुर्मीळ योग आहे. गवताळ भाग जिथे आहे,तिथे हे पक्षी आढळून येतात.मलंगगड, बदलापूर ग्रामीण या भागात हे पक्षी क्वचित दिसतात.

Thane : ठाण्यात आढळला दुर्मिळ (नाईटजार) रातवा; अशक्त रातवाला पॉज संस्थेने दिले जीवनदान
Mumbai Crime : मुंबईत रिक्षामध्ये महिला प्रवाशावर बलात्कार केल्याप्रकरणी यूपीतून आरोपीला अटक

रातवा (नाईटजार) या पक्षाचीं माहिती...

हा उडतांना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात. निशाचर असल्याने हे दिवसा एखाद्या झुडपाच्या आडोशाने लपून राहतात, अंधार पडल्यावर यांचे आवाज ऐकू येतात.झुडपी जंगले, शेतीचे प्रदेश, गावाच्या जवळील मोकळ्या प्रदेशात वास्तव्य असलेला भारतीय रातवा हा स्थालांतर करणारा आहे.

भारता शिवाय तो आशिया मधील तो देशातही आढळतो. लहान-मोठे कीटक हे भारतीय रातवा पक्ष्यांचे खाद्य आहे.हे पक्षी घरटे बांधत नाहीत,मादी जमिनीवरच १ किंवा २ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी किंवा जांभळे ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन नर-मादी मिळून करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.