

RTO Action On Ola, Uber and Rapido
ESakal
ठाणे : रॅपिडो बाईकला प्रवाशी वाहतुकीची परवानगी नसताना ठाण्यात अशा प्रकारची वाहतूक सुरु आहे. या अनधिकृत वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) सतर्क झाला आहे. आठ महिन्यात या विभागाने 82 जणांवर कारवाई केली आहे. आरटीओच्या धडक कारवाईने प्रवाशांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.