ठाणेकर उकाड्याने हैराण, तापमानाचा पारा 38 अंशावर

दीपक शेलार
Saturday, 5 September 2020

यंदा पाऊस अनियमित पडल्याने वातावरणात देखील झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. रात्री थंडावा तर दिवसा कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या असल्याने तापमानातील हे बदल आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.

ठाणे : गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा पर्जन्यमान 500 मिलीमीटर कमी झाले आहे. गतवर्षी 5 सप्टेंबरपर्यत 3606. 36 मि. मी. पावसाची नोंद झाली होती, परंतु यंदा मात्र, आजपर्यंत 3126.01 मि. मी. पाऊस झाला आहे. प्रारंभी अर्धा जून कोरडा गेल्याने पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर पावसाने जोर पकडत ऑगस्ट महिन्यात सातत्य ठेवल्याने धरणांचा कोटा पूर्ण झाला. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली. दरम्यान, मागील पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा उसंत घेतल्याने वातावरणात उष्णता वाढली असून उकाडयाने अंगाची काहिली होऊ लागली आहे. 

नक्की वाचा : दुसऱ्या पत्नीच्या वारसाला आर्थिक भरपाईमध्ये वाटा;  उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

यंदाचा पावसाळा लहरी ऋतुप्रमाणे बरसत आहे. निसर्गसारख्या वादळापासून मुंबई-ठाण्याला काहीसा दिलासा मिळाला असला तरी, जुलै व ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने झाला. जागोजागी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोकल सेवा आणि वाहतुकीवर निर्बध असल्याने जनजीवनावर विशेष परिणाम झाला नाही. सध्या धरणात पाणीसाठा मुबलक साठा आहे. 31 ऑगस्ट रोजी 22 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. वातावरणात उष्णता पुन्हा वाढू लागला आहे. परिणामी, नागरीक घामाघुम होत असल्याने घरगुती वीजेच्या वापरात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबई पालिकेतल्या १३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू, वाचा सविस्तर

वातावरणात बदल - 
यंदा पाऊस अनियमित पडल्याने वातावरणात देखील झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. रात्री थंडावा तर दिवसा कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या असल्याने तापमानातील हे बदल आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. पाऊस पुरता गेला नसला तरी, आगामी काळात उन्हाचा पारा चढताच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईसह पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट

तापमान तक्ता (अंश सेल्सियसमध्ये) 

महिना                   किमान               कमाल.              पर्जन्यमान (मि. मी.) 

2 सप्टें.2020 -         25.06               32.09                   00.00 
3 सप्टें. 2020 -        26.04               36.03                   00.00 
4 सप्टें. 2020 -        25.08               38.07                   00.50 
5 सप्टें. 2020 -        26.09               38.00.                  00.50 

(संपादन : वैभव गाटे)

thane residents harassed by heat temperature at 38 degrees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane residents harassed by heat temperature at 38 degrees