ठाणे : मागील तीन दिवसांपासून ३० टक्के पाणीकपातीची झळ सोसणाऱ्या ठाणेकरांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. टेमघर येथून पाणीपुरवठा करणारी वाहिनी पुन्हा फुटल्यामुळे आता ठाणेकरांना ५० टक्के कपातीला सामोरे जावे लागणार आहे. .जलवाहिनी दुरुस्तीचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचा फटका घोडबंदर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर आणि काही प्रमाणात कळवा येथील रहिवाशांना बसणार आहे..Mumbai Traffic: लिओनेल मेस्सी मुंबईत येणार, वाहतुकीत मोठे बदल; कधी अन् काय? वाचा....पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि. मि. व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथील महानगर गॅसचे काम सुरू असताना ६ डिसेंबरला जलवाहिनीला हानी पोहोचली होती. त्यामुळे ११ डिसेंबरपर्यंत शहरामध्ये ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. या कपातीची मुदत संपत असतानाच गुरुवारी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे..पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी अजून चार दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. शहरांमध्ये ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे..Navi Mumbai Airport: फ्लाइट सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई विमानतळावर घुसखोरी; एकाला अटक, नेमकं काय घडलं?.झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठाटंचाईमुळे कासावीस झालेल्या घोडबंदरवासीयांना या कपातीची सर्वाधिक झळ पोहोचणार आहे. याशिवाय लोकमान्यनगर, सावरकरनगर, वर्तकनगर भागातही पाणीटंचाई निर्माण होणार आहे, मात्र या भागांमध्ये दिवसातून एकदा १२ तासांने झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच जेथे सर्वाधिक टंचाई निर्माण होईल. तेथे मागणीनुसार ठाणे महापालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.