

Ring Metro Project
ESakal
ठाणे : बहुचर्चित असलेल्या अंतर्गत मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र अंतर्गत मेट्रोच्या मार्गातील ठाणे स्थानक ते नवीन ठाणे रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या दीड किमीच्या परिघातील १३२ इमारती अडथळा ठरण्याची शक्यता आहे. या इमारतींच्या खालून भूमिगत मेट्रो मार्ग जाणार असल्यामुळे त्यांच्या पायाची खोली किती आहे, हे तपासण्यासाठी महामेट्रोने ठाणे महापालिकेकडे या इमारतींचे संरचनात्मक नकाशे मागविण्यात आले आहेत.