

School student consuming drugs
ESakal
मुंबई : राज्यभरात अमली पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. अमली पदार्थांची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना अटक केली जात आहे. अशातच ठाण्यात एका शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे शाळकरी मुलांमध्ये अमली पदार्थांचा वापर वाढतोय का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.