ठाणे : आर.टी.ई प्रवेशाची दुसरी प्रतिक्षा यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे : आर.टी.ई प्रवेशाची दुसरी प्रतिक्षा यादी जाहीर

ठाणे : शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील ३७३ बालकांच्या शाळेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशाची दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून, दिलेल्या तारखेनुसार पालकांनी आपल्या पाल्यांचे शाळा प्रवेश करून घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे.

दुर्बल घटकातील बालकांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सरकारने आरटीईअंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील अनुदानित व खासगी अनुदानित शाळांमध्येदेखील ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमांतर्गत सुमारे २५ हजार बालकांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला आहे. यंदा मात्र दिवाळी संपत आली तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही प्रक्रिया थोडी थंडावली होती. यंदाच्या वर्षी आतापर्यंत सुमारे साडेसहा हजार बालकांना आरटीईअंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेता आला; मात्र तरीही शेकडो मुले प्रतीक्षा यादीत होती. अखेर प्रशासनाने दुसरी प्रतीक्षा यादीही जाहीर केली असून, त्यामध्ये ३७२ बालकांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: परभणीत नवीन विद्युत मिटर बसविण्यापुर्वीच त्यामध्ये फेरफार ? 

प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांना बंदी
निवड झालेल्या बालकांच्या पालकांना संबंधित शाळेकडून मोबाईल एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळवली जाईल, परंतु पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याची तारीख पाहावी. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्याबरोबर घेऊन जाऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे.

loading image
go to top