Thane Senior Citizen Duped of ₹1.06 Crore
esakal
सायबर गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याद्वारे ठाणे शहरातील एका ७८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १.०६ कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. यावेळी आरोपीने गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक परताव्याचं आमिष देत या जेष्ठ नागरिकाला फसवलं आहे. त्याच्या तक्रारीनंतर याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे.