MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
sakal
ठाणे - ठाण्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू असताना दिल्लीच्या संसदेत मात्र ठाण्याचा झेंडा पुन्हा उंचावला आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संसदीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. एकाच परिसरातील दोन खासदारांना सलग दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाल्याने ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.