Thane News: शिवशाही बसला आग! ठाण्यात सॅटिस पुलावरील घटनेत १४ प्रवासी बचावले

Shivshahi Bus Fire: ठाण्यात शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये १४ प्रवासी सुखरूपरित्या बचावले आहेत. परंतु या घटनेत बस जळून खाक झाली आहे.
Thane Shivshahi Bus Fire

Thane Shivshahi Bus Fire

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस ब्रिजवर गुरुवारी (ता. २३) दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) शिवशाही एसी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत जीवितहानी झालेली नसून प्रवास करणारे सर्व १४ प्रवासी तसेच चालक-वाहक सुरक्षित बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. आगीवरील नियंत्रणासाठी एक तासाचा कालावधी लागला असून, आगीत बस जळून खाक झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com