

sewage water use in School bathrooms
ESakal
ठाणे : दिव्यातील मातोश्रीनगर येथील एका खासगी शाळेत लहान मुलांच्या आरोग्याशी खेळला जात असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ड्यू ड्रॉप नावाच्या शाळेत पाण्याची मोटार लावून चक्क गटाराचे पाणी विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये वापरायला दिले जात होते. काही पालकांनी दिवा मनसेच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे शाळेत गटाराचे पाणी वापरले जात असल्याची तक्रार केली. दरम्यान, महापालिका शिक्षण विभागाकडे यासंदर्भात संपर्क केला असता, पालिका उपायुक्त सचिन सांगळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.