ठाणे शहर : मोडकळीस आलेली वाहने आणि अपुरे मनुष्यबळ असतानाही ठाणे एसटी विभागाने दिवाळीच्या जादा प्रवासात चांगली कामगिरी केली आहे. अवघ्या १२ दिवसांमध्ये एसटीने १२ लाख १२ हजार ७६६ प्रवाशांची वाहतूक करून १२ कोटी ८२ लाखांचे उत्पन्न मिळवले..यंदाच्या प्रवासात एसटी विभागाचे उत्पन्न एक कोटी १५ लाखांनी वाढले आहे. या कालावधीत एसटीने ३९ लाख ७६ हजार किलोमीटर प्रवास केला आहे. सण, उत्सवांमध्ये सर्वसामान्यांचे हक्काचे वाहतुकीचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते..ठाणे एसटी विभागानेदेखील प्रवासी वाहतुकीचे कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावले आहे. यंदाच्या दिवाळीतही प्रवाशांनी एसटीवर विश्वास ठेऊन प्रवास करण्यासाठी तिचा वापर केला. दिवाळी आणि भाऊबीजसाठी लाडक्या बहिणींनी एसटीमधून प्रवास करून एसटीला भरघोस उत्पन्न मिळवून देण्यात मोठा हातभार लावला आहे..Thane Water supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात शनिवारी २४ तास पाणीकपात.जास्त उत्पन्न२३ ऑक्टोबर - ८४ लाख ६२ हजार२६ ऑक्टोबर - ८६ लाख२७ ऑक्टोबर - ८७ लाख ५५ हजारएकूण प्रवासी - १२,१२,७६६महिला प्रवासी - ५,१४,८२८.परिवहनची कोट्यवधींची दिवाळी२०२४चे दिवाळीतील उत्पन्न - ११ कोटी ६७ लाख ५३ हजार२०२५चे दिवाळीतील उत्पन्न - १२ कोटी ८२ लाख ५९ हजार.जादा फेऱ्यांचा फायदामहिलांना सरकारकडून एसटी प्रवासासाठी सवलत दिली जात असल्याने तिचा एसटीचा प्रवास वाढला आहे. घरातील महिला एसटीने प्रवास करतात म्हणून तिचे कुटुंबदेखील प्रवासासाठी एसटीचा वापर करताना दिसत आहे. यातूनच एसटीचे प्रवासी वाढले आहेत. यंदा १८ ऑक्टोबरपासून दिवाळीचा मोसम सुरू झाला असल्याने एसटी विभागाकडून प्रवासी वाहतुकीसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. १८ ते २९ ऑक्टोबरच्या काळात ठाणे विभागातील एसटीने ३९ लाख ७९ हजार किलोमीटर प्रवास केला आहे..कौतुकास्पद कामगिरीयंदा ठाणे विभागातील आठ विभागांमधून ठाणे आगार क्रमांक १ने सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवले आहे. तर सगळ्यात कमी उत्पन्न वाडा आगाराचे आहे. अनेक अडचणींचा अडथळा पार करीत ठाणे विभागाने दिवाळीच्या काळात केलेली कामागिरी कौतुकास्पद आहे. यामुळे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी साऱ्यांचे कौतुक केले आहे. त्याचसोबत प्रवाशांनी एसटीवर विश्वास ठेवल्याने प्रवाशांचेदेखील आभार मानले आहेत..Mumbai News: वातावरण बदलाचा फटका! व्हायरल फीवरने मुंबईकर त्रस्त, रुग्णालयात रुग्णांच्या लांबलचक रांगा.सागर पळसुले विभाग नियंत्रकगेल्या वर्षा पेक्षा यंदा दिवाळीत एसटीने जादा प्रवास केला. त्यामुळे यंदाच्या उत्पन्नातदेखील चांगली वाढ झाली आहे. महिलांनीही प्रवासासाठी एसटीला प्राधान्य दिले आहे. भविष्यातही अशीच प्रगती करण्यासाठी प्रयत्न केला जाईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.