

ST bus
Esakal
ठाणे शहर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगिरी परीक्षणात ठाणे एसटी विभागाची कामगिरी घसरल्याचे समोर आले आहे. विभागातील कल्याण, ठाणे-१ आणि ठाणे-२ या आगारांना अनुक्रमे वजा ३३, वजा २९ आणि वजा २० असे नकारात्मक गुण मिळाल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिवहन मंत्र्यांच्या जिल्ह्यातच एसटी सेवेची गुणवत्ता खालावल्याची चर्चा प्रवासी वर्गात सुरू झाली आहे.