

Thane Teen Dies After Jump From 14th Floor
Esakal
Thane 16 Year Old Girl Death : ठाण्यात एका १६ वर्षीय मुलीने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय. सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रेया विश्वकर्मा असं मुलीचं नाव असून ती अकरावीत शिकत होती. आत्महत्येआधी तिनं सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. तिने आत्महत्या नेमकी का केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत.