ऊर्जा संवर्धनात ठाणे अव्वल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

ठाणे - ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत यंदाही ठाणे महापालिकेने महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरणातर्फे देण्यात येणाऱ्या दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांवर आपले नाव कोरले. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार महापालिकेचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी स्वीकारला.    

महापालिकेने ऊर्जा संवर्धन क्षेत्रात आजवर विविध उपाययोजना केल्या असून राष्ट्रीय; तसेच राज्यपातळीवर महापालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यंदाही महापालिका आणि हॉस्पिटल बिल्डिंग या दोन संवर्गात हा पुरस्कार ठाणे महापालिकेलाच प्राप्त झाल्याने विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा संवर्धनाला वाव आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे महत्त्व पटवून देणारी आदर्श महापालिका ठरली आहे. 

पालिकेने पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा केलेला वापर, पालिका इमारतीमध्ये दिवे वातानुकूलित यंत्रणा इ. साठी ‘ऊर्जा कार्यक्षम ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी’ या संस्थेने प्रमाणित केलेल्या स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करून ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. तसेच विविध इमारतींवर एकूण १० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. याशिवाय पालिकेच्या विविध शाळांच्या इमारतीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकूण २६७ किलो वॉट सौर प्रकल्पाचे कामही पालिकेने हाती घेतले आहे.

Web Title: Thane topper in energy conservation