
उल्हासनगर : नागरिकांची वाढती गर्दी, रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे शहाड रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागात आणि शिवाजी रोड परिसरात रोजची वाहतूक कोंडी आता इतिहासजमा होणार आहे. ठाणे वाहतूक विभागाने एक मोठा निर्णय घेत, शहाड स्टेशन परिसरात "नो पार्किंग" झोन तर महात्मा फुले चौक ते स्टेशन चौकदरम्यान "पी-१ आणि पी-२ पार्किंग झोन" जाहीर केले आहेत. पोलीस उपआयुक्त (वाहतूक), ठाणे शहर पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना ३० दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली असून नागरिकांच्या प्रतिसादानुसार ती कायमस्वरूपी केली जाणार आहे.