ठाणे वाहतूक पोलिसांकडून एक महिन्यात सव्वा तीन कोटींचा दंड वसूल

राहुल क्षीरसागर
Monday, 4 January 2021

ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे.

मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या 96,82 प्रकरणांमधील दंड वाहनचालकांनी भरला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी 14 फेब्रुवारीपासून ई चलान बजावण्यास सुरूवात केली होती. 13 डिसेंबर 2020 पर्यंत सुमारे 10 लाख 50 हजार वाहनचालकांना नियमभंग केल्याप्रकरणी ई चलान बजावण्यात आले होते. त्यांची दंडाची रक्कम सुमारे 26 कोटी रुपये आहे. ई चलान असल्याने दंडाची ही रक्कम भरण्यास वाहनचालक टाळाटाळ करत होते. कारवाई होत नसल्याने त्यांची बेदरकारीसुध्दा वाढली होती. 

हेही वाचा- आज रात्रीपर्यंत कूपर रुग्णालयाचे मॉडेल लसीकरण केंद्र होणार तयार

वाहनचालकांमध्ये नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढावी यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ई चलानच्या दंड वसूलीसाठी 1 डिसेंबर 2020 पासून धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महिन्याभरात 3 कोटी 23 लाख 94 हजार 450 रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यात कार्डच्या माध्यमातून 39 हजार 168 प्रकरणांमध्ये एक कोटी 52 लाख रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. 

56 हजार 916 वाहनचालकांनी रोखीने एक कोटी 71 लाख रुपयांचा भरणा केला आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून वाहन चालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दित ठाणे वाहतूक पोलिसांचे 18 विभाग कार्यरत आहे. यापैकी नारपोली विभागाने सर्वाधिक 40 लाख 37 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल कल्याण (29 लाख 15 हजार) उल्हासनगर (27 लाख 59 हजार), कळवा (26 लाख 55 हजार) या विभागाचा क्रमांक लागतो.  आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भरण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 

अशा पद्धतीने भरा ई चलानचा दंड

  • ठाणे शहर वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली 59 अधिकारी आणि अंमलदारांकडे ई चलान मशिन आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही चलानची रक्कम रोख किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तिथे भरता येते.
  • www.mahatrafficgov.in या शासनाच्या वेबसाटवर आपल्या वाहनाचा किंवा चलान क्रमांक नोंदविल्यास प्रलंबित तडजोड शुक्ल दिसून येईल. तिथे चलान क्रमांकाची निवड करून दंडाची रक्कम भरता येते. 
  • पेटीएम अँप मध्ये रिचार्ज आणि बिल पेमेंट या पर्यायांवर क्लिक केल्यानंतर चलान नावाचा टँब दिसतो. तिथे पुन्हा क्लिक केल्यानंतर Traffic Authority अशी विचारणा केली जाते. त्यावर महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिस हा पर्याय निवडावा. त्यानंतर वाहन किंवा चलान क्रमांक नोंदवून दंडाची रक्कम भरता येते. 
  • Mahatriffic App,Mum traffic App  मध्ये My Vehicle या टँबवर क्लिक करून आपल्या गाडीचे रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर My E challan मध्ये आपल्या गाडीवर किती तडजोड रक्कम बरायची आबे ते दिसेल. त्यानंतर चलानवर क्लिक करून त्या रकमेचा भरणा करता येईल.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane Traffic Police recovered fine rupees three crore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Traffic Police recovered fine rupees three crore