
ठाणे : महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाच्या ठाणे - कोल्हापूर बसच्या दुरावस्थेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे विभागाने ही बस तात्काळ ठाण्याला परत बोलवून घेतली असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे विभाग वाहतूक नियंत्रक सागर पळसुले यांनी सांगितले आहे. अत्यंत दयनीय अवस्थेत ही बस ठाणे आगार क्रमांक २ येथून सोडण्यात आली होती. मात्र एका महिला प्रवाशाने बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर ठाणे विभातील अधिकाऱ्यांनी सारवासारव करत दोषींवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.