
ठाणे : जोशी बेडेकर महाविद्यालयात लसीकरणाचा शुभारंभ
ठाणे : १८ वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कोरोना प्रतिबंधक लशीचा लाभ मिळावा, याकरिता ठाणे महापालिकेतर्फे प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ठाणे (Thane) शहरातील जोशी बेडेकर महाविद्यालयात सोमवारी लसीकरण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
हेही वाचा: प्रभाकर साईल खोटारडा; किरण गोसावीचा व्हिडिओ आला समोर
याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जोशी बेडेकर महाविद्यालयात २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत लसीकरण शिबिर सुरू राहणार असून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही शंका न ठेवता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा. तसेच लसीकरणापासून वंचित राहिलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींनाही लस घेण्याचे आवाहन करावे, असे प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक यांनी सांगितले.
Web Title: Thane Vaccination Launched At Joshi Bedekar College
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..