ठाणे : मुंबई महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रातील गेटमुळे नदी पात्रातील पाणी पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पालिकेला पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नसल्याने ऐन गणेशोत्सवात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी पिसे पाणी उपसा केंद्राजवळील नदीपात्रामध्ये गाळ, कचरा यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात ३० टक्के कपात झाली होती.