आभार मुंबई... उत्सवाप्रमाणे विसर्जनही साध्या पद्धतीने; महापौर, आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार

समीर सुर्वे
Thursday, 3 September 2020

जगभरासाठी आकर्षण असलेला मुंबईतील गणेशोत्सव यंदा साध्या पध्दतीने साजरा केल्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. 

मुंबई : जगभरासाठी आकर्षण असलेला मुंबईतील गणेशोत्सव यंदा साध्या पध्दतीने साजरा केल्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. कोव्हिड पार्श्वभूमीवर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 1 लाखाहून कमी गणपतीची प्रतिष्ठापना मुंबईत  झाली होती.

बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; मुंबईतून एकाला अटक 

गणेशोत्सवाचे दिवस त्यानंतर अनंत चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुका, यासाठी मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिध्द आहे. मात्र, यंदा गणेशोत्सव तसेच, विसर्जन सोहळाही साध्या पध्दतीने पार पडला. प्रसिध्द सार्वजनिक गणपतीचे विसर्जन मंडपातच करण्यावर भर देण्यात आला. दरवर्षी 26-27 तास विसर्जन मिरवणुका सुरु असतात. यंदा रात्रीच विसर्जन सोहळा आटोपला होता.  

अनंत चतुर्थी पर्यंत यंदा 1 लाख 35 हजार सार्वजनिक घरगुती गणपतींसह गौरींचे विसर्जन झाले. तर, गेल्या वर्षी 2 लाख 30 गौरी गणपतींचे विसर्जन झाले होते. यंदा 70 हजारहून अधिक विसर्जन कृत्रिम तलावात झाले तर गेल्या वर्षी 33 हजार गणपती विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते. यंदाच्या अनंत चतुर्थीला 28  हजार 293 मुर्तीचे विसर्जन झाले तर, गेल्या वर्षी 38 हजार 361 मुर्तींचे विसर्जन झाले होते.

मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची - 

कमी मुर्तींची प्रतिष्ठापना
कोव्हिडच्या पार्श्वभुमीवर मुंबईतून मोठ्या प्रमाणात स्थालांतर झाले आहे. त्याच बरोबर या काळात रोजी रोटीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कमी मुर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thank you Mumbai ... Immersion is like a festival in a simple way; Mayor, Commissioner thanked Mumbaikars