esakal | प्रशासनाला आली जाग ,चारकोपमधील खड्डे बुजले !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

प्रशासनाला आली जाग ,चारकोपमधील खड्डे बुजले !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कांदिवली : कांदिवली पश्चिम येथील चारकोप काडसिद्धेश्वर मार्गावर भूमिगत मलनिस्सारण वाहिनी मायक्रो टनेलिंग पद्धतीने टाकण्याचे काम वर्षभर सुरू आहे. त्यात रस्ता अडवला गेला असताना उपलब्ध एका मार्गिकेवर खड्डे पडले होते. याबाबत 'सकाळ'ने बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली असून हे खड्डे बुजवण्यात आले.

हेही वाचा: पिंपरी : मुंबई आणि नाशिक महामार्ग ‘ब्लॉक’

मार्गावर खड्डयात पेवर ब्लॉक्स टाकण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना तारेवरची कसरत करत त्रास सहन करावा लागत होता. याबाबत "सकाळ'मध्ये बुधवारी (ता. २८) 'चारकोपमध्ये रस्त्यावर खड्डे' मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पालिकेच्या आर मध्य विभागाने दखल घेत खड्डे बुजवून-साहनचालकांसह प्रवाशांना दिलासा दिला आहे.

loading image
go to top