esakal | तीनसदस्यीय'ला काँग्रेसचा विरोध नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

तीनसदस्यीय'ला काँग्रेसचा विरोध नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिका (Municipal) निवडणुकीच्या (Election) तीन सदस्यांच्या प्रभाग पद्धतीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली तरीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पद्धतीला काँग्रेसच्या एकाही मंत्र्याने विरोध केला नाही. तिथे मते मांडली व त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वानुमते तीन सदस्यीय प्रभाग पद्धत जाहीर केल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच गुरुवारी स्पष्ट केले.

आघाडी सरकारमधील निर्णयांत समाधानी राहायचे असते, त्यावर पुन्हा 'स्टेटमेंट' द्यायचे नसते, असा सल्लावजा चिमटाही पवार यांनी काँग्रेस नेत्यांना काढला. विशेष म्हणजे, प्रभागांच्या स्वरूपावरून काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यादेखत सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या मंत्र्यांसह बहुतेकांनी आपली मते मांडल्यानंतरच अंतिम निर्णय झाला, तेव्हाच काँग्रेसच्या मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध का केला नाही, असा प्रश्नही पवार यांच्या खुलाशाने उभा राहिला आहे. महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करीत, दोन सदस्यांचा प्रभाग करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तीन सदस्यीय पद्धती भाजपसाठी सोयीची असल्याने त्यात बदल न केल्यास कायदेशीर लढण्याचा इशाराही पटोले यांनी दिला.

हेही वाचा: पुणे महापालिकेला सांडपाणी प्रकल्पांसाठी मिळेना जागा

पवार म्हणाले, "बहुसदस्यीय प्रभागांच्या पद्धतीला कोणाचाही विरोध नव्हता. या बैठकीला काँग्रेसचे मंत्री होते. प्रभागांच्या प्रस्तावावर त्यांनी आपली मते मांडली. ती मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऐकून घेतली. त्यानंतरचा निर्णय झाला आहे. अशा प्रकारच्या निर्णयाला विरोध योग्य नाही. या प्रभागांच्या निर्णयामुळे आकाश कोसळले नाही.

loading image
go to top