esakal | धरणे वाहू लागली ओसंडून; 53 टक्के भरल्याने संपले टेंशन
sakal

बोलून बातमी शोधा

धरणे वाहू लागली ओसंडून; 53 टक्के भरल्याने संपले टेंशन

धरणे वाहू लागली ओसंडून; 53 टक्के भरल्याने संपले टेंशन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : पावसाने मुंबईला या आठवड्यात बेहाल केले असले तरी या दमदार पावसाने पाणी कपातीचे संकट दुर झाले. मुंबईतील धरणांमध्ये 53 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर, आज पाहाटे मोडगागर आणि तानसा ही धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज सकाळ पर्यंत 7 लाख 79 हजार 569 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. तर, वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. गेल्या तीन वर्षातील हा सर्वाधिक साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 4 लाख 16 हजार 429 दशलक्ष लिटर आणि 2019 मध्ये 7 लाख 78 हजार 159 दशक्षल लिटर पाणीसाठा जमा होता.

हेही वाचा: दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद

जुलैच्या पहिल्या पंधरावड्या पर्यंत मुंबईवर पाणी कपातीचे संकट कोसळण्याची भिती होती. तलावांना अक्षरश: तळ गाठला होता.मात्र,गेल्या आठवड्या पासून सुरु झालेल्या दमदार पावसाने एका पाठोपाठ एक धरणे भरु लागली आहे. तुळशी, विहार ही धरणे भरल्यानंतर आज पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास मोडकसागर आणि 6 वाजल्याच्या सुमारास तानसा ही दोन्ही धरणे भरुन वाहू लागली आहेत.

हेही वाचा: राजकीय पक्ष घटस्फोटीतांचा आसरा! रोज नवा जावई, रोज नवा सासरा

तलावातील पाणी पातळी (मिटरमध्ये) पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

- तलाव - पुर्ण भरल्यावर पातळी - आजची पातळी - पाणीसाठा

- अप्पर वैतरणा - 603.51---595.83----9780

- मोडकसागर --163.15---163.15-----128925

- तानसा - 128.63---128.60---144593

- मध्य वैतरणा-285.00---266.17---92342

- भातसा - 142.07---127.60----368184

- विहार - 80.12---80.47---27698

- तुळशी - 139.17---139.33---8046

loading image