Mumbai : मोटार सायकल चालविण्याची हौस पडली महागात

चोरलेल्या मोटारसायकल चालविण्यासाठी म्हणून तो आला आणि रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अनुराग उर्फ गुड्ड्या अडारी (वय 22) असे अटक आरोपीचे नाव आहे.
अटक
अटकsakal

डोंबिवली- गाडी चालविण्याचा मोह असल्याने त्याने गाड्या चोरण्यास सुरुवात केली. गाडी चोरीच्या आरोपात जेलची हवा खाऊन आल्या नंतरही त्याला आपला मोह आवरता आला नाही. जेलमधून बाहेर येऊन पुन्हा मोटारसायकल चोरल्या.

चोरलेल्या मोटारसायकल चालविण्यासाठी म्हणून तो आला आणि रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अनुराग उर्फ गुड्ड्या अडारी (वय 22) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या 3 मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. तसेच 17 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

अंबरनाथ येथील भवानी चौकातील वरचा पाडा परिसरात गुड्ड्या राहण्यास आहेस. मोटार सायकली चालविण्याचा शौक असल्याने मोटार सायकल चोरण्यास त्याने सुरुवात केली. मोटार सायकल चालवून नंतर तो तशाच सोडून देत असे.

डोंबिवलीतील पेंडसेनगर येथे राहणारे दिलीप मराठे (वय 73) यांची मोटारसायकल सार्वजनिक रोडवरुन 11 जानेवारीला चोरीला गेली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. रामनगर चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, सुनिल भणगे, सचिन भालेराव, शिवाजी राठोड यांनी तपास सुरु केला.

परिसरातील सीसीटिव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये चोरीची घटना कैद झाली होती. सीसीटिव्ही आणि गुप्त बातमीदार यांच्या मार्फत बाईक चोराने अंबरनाथ या ठिकाणी नेऊन ठेवली. असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ येथे पोलिसांनी सापळा रचला. गुड्ड्या तेथे मोटार सायकल घेण्यास आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली तीन चोरीच्या मोटार सायकली मिळून आल्या.

डोंबिवली पोलिस ठाण्यातील 2 व नारपोली पोलिस ठाण्यातील 1 मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली असून पोलिसांनी त्या गाड्या हस्तगत केल्या असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक भराडे यांनी दिली.

गुड्ड्या हा सराईत गुन्हेगार असून त्याने आत्तापर्यंत घरफोडी, सोनसाखळी चोरी, मोटार सायकल चोरीचे 14 गुन्हे केले आहेत. डोंबिवली, नारपोली, उल्हासनगर, अंबरनाथ, महात्मा फुलै चौक व खडकपाडा पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या गुन्ह्यात कारागृहातून तो शिक्षा भोगून तीन महिन्यांपूर्वीच बाहेर आला होता अशी माहितीही पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com