esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

खाद्यपदार्थांवर एफडीएची नजर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खाद्यपदार्थांचे उत्पादन, हाताळणी आणि प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा कटाक्ष राहणार आहे. यासाठी प्रशासनाने 'आयडियल इन्स्पेक्शन' सुरू केले असून, संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर असणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंह यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यभरात आरोग्यासंबंधी वस्तूंचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर आतापार्यंत ३४०० पेक्षा अधिक ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत, तर २५० जणांवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. पुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.

हेही वाचा: मुंबई : घाटकोपरच्या मंदिरात दिव्यांची आरास

मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर या शहरांतील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर विशेष लक्ष असेल. यासाठी प्रशासनाने पथके नेमली असून त्यात १५ ते २० अधिकारी, कर्मचारी असतील. त्या माध्यमातून ठिकठिकाणी परीक्षण केले जाणार आहे.

loading image
go to top