esakal | Mumbai : राष्ट्राचा पाया विचारांवर अवलंबून
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

राष्ट्राचा पाया विचारांवर अवलंबून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘`राष्ट्राचा पाया हा विचारांवर अवलंबून असतो. ते विचार जनसामान्यांमध्ये रुजविण्याचे काम पत्रकार, लेखकांनी केले आहे. संदीप काळे यांनी तोच सामाजिकीकरणाचा पायंडा पुढे नेत आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजनिर्मितीचे काम केले आहे, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

सकाळ ‘यिन’चे संपादक संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे प्रकाशन कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, ‘‘काळे यांचे ‘ऑल इज वेल’ पुस्तकातून त्यांच्या आई-वडिलांचा त्याग तसेच त्यांचे प्रेम व परिश्रम दिसून येतात.’’ राज्यपालांनी या वेळी संदीप काळे यांच्या आई-वडिलांचा सत्कार केला. श्रीराम पवार म्हणाले, ‘‘संदीप काळे यांचा लोक जोडण्याचा हातखंडा कमालीचा बोध घेण्यासारखा आहे.’’

loading image
go to top