esakal | ठाणे पालिकेतील ४९ कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे पालिकेतील ४९ कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे (Thane) महापालिकेच्या सेवेत बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर करत ४९ जणांनी नोकऱ्या लाटल्याची बाब समोर आली आहे. या मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते सर्वजण आजही सेवेत कार्यरत आहेत.

यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून शासनाकडून सूचना आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता पालिकेतील अधिकान्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा प्रकार नुकताच समोर आले. एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे फसवणूक करून नोकरी लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासह त्यांना सेवेतून कमी करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असताना ते अद्यापही सेवेत असल्याचेही उघड झाले. तसेच काही कर्मचारी आपली सेवा पूर्ण करून निवृत्तही झाले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

loading image
go to top