esakal | दोन घरांचे एक घर केले ; मेंटेनन्सची दोन बिले द्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दोन घरांचे एक घर केले ; मेंटेनन्सची दोन बिले द्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विकसकाने नव्या इमारतीत (Building) टू-बीएचके (2BHK) आणि वन-बीएचकेची (1BHK) दोन वेगळी घरे बांधून नंतर ती थ्री-बीएचके म्हणून एकत्रित विकली असली तरी प्रत्यक्षात ती दोन वेगवेगळी घरे असल्याचा निकाल सहकार उपनिबंधकांनी दिला आहे. त्यामुळे सोसायटीने (Society) या दोन घरांना दोन वेगवेगळी देखभाल-दुरुस्तीची (मेंटेनन्स) बिले (Bill) द्यावीत, असाही आदेश त्यांनी दिला आहे.

सहकारी संस्थांच्या आर दक्षिण प्रभागाचे उपनिबंधक डॉ. सुनील कोठावळे यांनी नुकताच कांदिवलीच्या (पश्चिम) आरएनए रॉयल पार्क इमारतीसंदर्भात हा आदेश दिला आहे. लहान घरे असलेल्या अमिताभ अरोरा व अन्य सदस्यांनी याबाबत उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. थ्री-बीएचकेच्या घरांना सोसायटी एकच मेंटेनन्स बिल देते. प्रत्यक्षात दोन घरे एकत्रित करून थ्री-बीएचके बांधल्याने त्यांना मेंटेनन्सची दोन बिले दिली पाहिजेत, असे अर्जदारांचे म्हणणे होते, उपनिबंधकांनी ते मान्य केले.

हेही वाचा: 'ओ शेठ' नंतर गाजणारे 'ओ सर' गाणं; पाहा व्हिडिओ

थ्री- बीएचके घरे ही प्रत्यक्षात टू-बीएचके आणि वन-बीएचके अशी दोन घरे वेगवेगळी बांधून ती नंतर एकत्र केली होती. विकसकाने त्याची नोंदणीही दोन-दोन वेगवेगळ्या घरांची केली होती. त्यानुसार त्यांची दोन वेगवेगळी नोंदणीकृत खरेदीखते होती. सोसायटीनेही त्या दोन वेगवेगळ्या घरांची दोन वेगवेगळी शेअर सर्टीफिकेट दिली होती. सोसायटीच्या नोंदणीत त्या दोन घरांचे दोन वेगवेगळे सदस्य दाखवले होते. ते दोघेही जनरल बॉडी मिटिंगला हजर राहत व मतदानही दोघे जण करीत असत. त्या दोन्ही घरांना दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे, दोन वेगवेगळी स्वयंपाकघरे-न्हाणीघरे-स्वच्छतागृहे होती. त्यामुळे त्या दोन्ही घरांना स्वतंत्र सेवासुविधा मिळत असल्याने त्यांना दोन मेंटेनन्स बिले द्यावीत, अशी अर्जदारांची मागणी होती; मात्र सोसायटीने ती अमान्य केल्याने हा वाद उद्‍भवला.

हेही वाचा: ऑनलाईन पेंमेंटला अर्जदारांची पसंती 

विकसकाच्या माहितीपुस्तकेनुसारही थ्री-बीएचके म्हणजे प्रत्यक्षात दोन वेगवेगळी घरे होती त्यांच्यात फक्त मधली भिंत नव्हती. ही बाब घरे घेतेवेळीच सर्वांना ठाऊक होती. सुरुवातीला थ्री-बीएचके सदनिकाधारकांनी विकसकाला वार्षिक सेवाशुल्कही दोन घरांचे वेगवेगळे दिले होते, असेही अर्जदारांनी दाखवून दिले. या घरांचा विजेचा मीटर एकच असून, पालिकेचे मालमत्ता कराचे बिलही एकच येते. विकसकाने त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी दोन घरांची वेगवेगळी नोंद केली, असे सोसायटीने सांगितले; मात्र उपनिबंधकांनी सोसायटीचा दावा फेटाळला. थ्री-बीएचके सदनिका हे एकच घर नसून दोन घरे असल्याने त्यांना त्यानुसार मेंटेनन्सची दोन बिले द्या, असा आदेश त्यांनी दिला.

loading image
go to top