esakal | मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९६ टक्के भरले
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९६ टक्के भरले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात गरजेच्या ९६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. आता फक्त ५२ हजार ३९१ दशलक्ष लिटर पाण्याची (Water) गरज आहे. पुढील काही दिवसांत पुन्हा पावसाची (Rain) शक्यता असल्याने या महिनाअखेरीस गरजेचा १०० टक्के पाणीसाठा जमा होईल, असे जवळजवळ निश्चित आहे.

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी तलावात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होण्याची गरव आहे. शनिवार सकाळपर्यंत सात तलावांमध्ये १३ लाख ९४ हजार ९१७२ दशलक्ष लिटर महिन्याच्या अखेरपर्यंत तलाव १०० टक्के भरल्यास पुढील जूनपर्यंत हा पाणीसाठा गरज भागवू शकतो. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने मुंबईवर पाणीकपातीचे संकट आले होते. जुलै महिन्यातील मोजक्या दिवसातच पावसाने कोटा भरून काढला. त्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये पावसाची ये-जा सुरू होती. मात्र, अखेरीस तलावात अपेक्षित पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेने हा पाणीसाठा भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग शहापूर

हेही वाचा: मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा? रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ

मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण पूर्ण भरून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. भातसा धरण क्षेत्रात यंदा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा २०० मिमी कमी पडला; पण पावसाने सातत्य राखल्याने भातसा धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे धरणाचे १ ते ५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

loading image
go to top