esakal | मुंबई : लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळं ज्येष्ठ नागरिकाचा वाचला जीव!
sakal

बोलून बातमी शोधा

Train

लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळं ज्येष्ठ नागरिकाचा वाचला जीव!

sakal_logo
By
सुचिता करमरकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई-वाराणसी ही लांबपल्याची रेल्वेगाडी कल्याण रेल्वे स्थानकातून सुटतानाच एक ज्येष्ठ नागरिक रेल्वे क्रॉसिंगच्या नादात रेल्वेखाली अडकून पडला. ही बाब लक्षात येताचं लोको पायलट्सनं सुरु झालेल्या रेल्वेला इमर्जन्सी ब्रेक्स लावल्यानं संभाव्य धोका टळला आणि संबंधित व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (The lives of senior citizens were saved due to the incident of loco pilot aau85)

हेही वाचा: मुंबईत मुसळधार पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, जाणून घ्या सविस्तर

रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं, कल्याण स्थानकातून मुंबई-वाराणसी रेल्वे नुकतीच सुरु झाली. याच वेळी ज्य़ेष्ठ नागरिक रेल्वे खाली अडकल्याचं दिसून आलं. ही माहिती कळताच लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रविशंकर जी. यांना कळताच त्यांनी तातडीने इमर्जन्सी ब्रेक्स लावले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचू शकले. रुळांवर उभ्या असलेली रेल्वे क्रॉस करण्याच्या प्रयत्नात पाय अडकला आणि पडले त्याचक्षणी रेल्वे सुरु झाली. त्यामुळे ते रेल्वे आणि रुळ यांच्यामध्ये अडकून पडले. पण लोको पायलट्सच्या प्रसंगवधानामुळं संभाव्य धोका टळला. या नागरिकाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा: Mumbai Train: आवाज नाही उठविला तर, उपासमारीची वेळ येणार

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आणत रेल्वे रुळ ओलांडणं किती धोकादायक आहे हे सांगण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. बेकायदा पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडू नका हे जीवघेणं ठरु शकतं असा इशाराही यावेळी रेल्वेचे चीफ पर्मनंट वे इन्स्पेक्टर संतोष कुमार यांनी दिला. तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी प्रसंगावधान दाखवल्याबद्दल लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट तसेच निरीक्षकांना दोन हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

loading image