ठाण्याचे मालक असल्यासारखे कारभार हाकतायेत महापौर : आनंद परांजपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

ठाण्याचे मालक असल्यासारखे कारभार हाकतायेत महापौर : आनंद परांजपे

ठाणे : ठाणे पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर आता, राजकीय फटकेबाजी सुरू झाली आहे. त्यात मागील अनेक दिवसांपासून विविध प्रश्‍नांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता, पालिका निवडणुकांमध्ये आघाडी करायची की नाही, यावरून ठाण्याचे राजकारण तापले आहे.

आघाडीची कोणाला गरज नसेल तर एकहाती सत्ता आणू या महापौरांच्या विधानानंतर राष्ट्रावादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापौरांचा समाचार घेतला. एकीकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आघडीचा धर्म पाळला असताना महापौर मात्र हे ठाण्याचे मालक असल्यासारखे कारभार हाकीत असल्याची टीका परांजपे यांनी केली.

हेही वाचा: कर्नाटकातील मराठा समाजाची मागणी आयोगाने फेटाळली

निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात दुसरीकडे पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सकारात्मक वातावरण आहे. असे असले तरी, ठाण्यात मात्र बिघाडीचे संकेत स्थानिक पातळीवरून मिळत आहेत. याची सुरुवात ठाणे पालिकेत जेमतेम तीन नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसच्या शहराध्य्क्षांकडून अनेकदा स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. असे असले तरी खरा संघर्ष हा सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. कोणाला आघाडीची गरज नसेल तर शिवसेना एक हाती सत्ता आणेल, असा दावा करून महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेनेलाही आघाडीची गरज नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हेही वाचा: ....अन महापौरांच्या घोषणेमुळे शिवसैनिकांमध्ये गोंधळ

महापौरांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनीही महापौरांच्या या व्यक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शिवसेनेबद्दल नाराजी नाही. ठाणे जिल्ह्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आघाडीचा धर्म पाळत आहेत. राष्ट्रवादीची कामे देखील ते करीत असतात. मात्र, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या कार्यप्द्ग्तीबाब्त नाराजी आहे.

loading image
go to top