esakal | नवी मुंबईतील कामगाराच्या हत्येचा उल्हासनगरात उलगडा
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai

नवी मुंबईतील कामगाराच्या हत्येचा उल्हासनगरात उलगडा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उल्हासनगर: सोमवारी अनोळखी व्यक्तीचा तलावात मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न होताच मृतकाच्या हातावरील टॅटू आणि पॅंटीवरील टेलरच्या लोगोमूळे नवी मुंबई गाठणाऱ्या विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून, त्याच्या दोन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मृतकाच्या पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय घेण्यावरून ही हत्या करण्यात आली असून, मृतकाला असलेले दारूचे व्यसनही त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे.

हेही वाचा: मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक

चिंचपाडा परिसरात असलेल्या गावदेवी तलावात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या पॅन्टवरील टेलरच्या लोगोवरून तो नवी मुंबईचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल राजपूत हे त्याची ओळख काढण्यासाठी नवी मुंबईला गेले होते. तिथे रबाळे पोलीस ठाण्यात नाका कामगार चंद्रकांत शेलार हा मिसिंग असल्याची तक्रार दाखल होती.

दरम्यान, शेलार यांचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवसांनी आला. त्यात त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांच्या, मित्रांचे मोबाईल चेक केले असता त्यात एक नंबर सातत्याने शेलारला येत असल्याचे समोर आले. त्यानुसार साजन कांबळे आणि डिवाइन घोणसालविस यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्यांनी शेलारच्या हत्येची कबुली दिली.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी राजांना उतरावे लागते रस्त्यावर - ढोबळे

चंद्रकांत शेलार याला साजन कांबळे हा त्याच्या पत्नीशी बोलतो. त्यांच्यात अनैतिक संबंध आहेत असा संशय होता. त्यावरून दोघात खटके उडत होते. चंद्रकांतला दारूचे व्यसन होते. याचाच फायदा घेऊन त्याचा काटा काढण्याचा प्लॅन साजन कांबळे याने रचला. त्यासाठी कल्याणला राहणारा डिवाईन घोणसालविस याची मदत घेतली. आपल्याला दारूच्या पार्टीसाठी कल्याणला जायचे आहे असे साजन म्हणताच चंद्रकांत तयार झाला आणि चिंचपाडा तलावा जवळ असलेल्या अंधारात त्याची गळा चिरून हत्या केल्यावर त्याला तलावात फेकून देण्यात आले.

विठ्ठलवाडी पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना टेलरच्या लोगोवरून ओळख काढून अवघ्या 24 तासात दोघांना अटक केल्याबद्दल परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांचे कौतुक केले आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात, धनंजय करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस नाईक रोहित बुधवंत, भरत खांडेकर, निलेश तायडे, पोलीस शिपाई समीर गायकवाड, कृपाल शेकडे, हनुमंत सानप, मंगेश विर, हरिश्चंद्र घाणे या टीमने बजावली आहे.

loading image
go to top