esakal | राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 5 जिल्ह्यांत सर्वाधिक | MumbaI
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 5 जिल्ह्यांत सर्वाधिक

sakal_logo
By
अक्षय साबळे

मुंबई : राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने घट झाल्याची दिलायादायक बाब कोविड रुग्णसंख्येवरुन स्पष्ट दिसत आहे.  राज्यात 17 सप्टेंबर 2020 या दिवशी ३ लाख 01हजार 752 सक्रिय रुग्ण होते. ही संख्या 22 एप्रिल 2021 मध्ये दुप्पट होऊन 6 लाख 99 हजार 858 वर पोहोचली. मात्र, आता एप्रिलनंतर या संख्येत घट होऊन 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत 33 हजार 159 वर पोहोचली.  त्यामुळे, राज्यात सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली आहे.जुन महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली. त्यानंतर, दर दिवशी 10 हजारांच्या दरम्यान रुग्णसंख्या येत होती. मात्र, आता ऑगस्टनंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या थेट 2 ते अडीच हजाराच्या दरम्यान आहे.सध्या राज्यात 33,159 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी पाच जिल्ह्यांत अजूनही चिंता कायम असून पुणे गेल्या दोन महिन्यांपासून अव्वल यादीत आहे.

सर्वाधिक सक्रिय जिल्हे

सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. त्यानंतर अहमदनगर, ठाणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक नोंदली गेली आहे. या पाच जिल्ह्यांतून 74 टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे.

पहिले पाच जिल्हे

जिल्हा सक्रिय रुग्ण (27 सप्टेंबर) (सक्रिय रुग्ण 5 ऑक्टोबर)

  1. पुणे - 9,243 8,593

  2. मुंबई - 5,053 6,161

  3. अहमदनगर 5,506 4,280

  4. ठाणे 5,888 3,750

  5. सातारा 2,201 1,898

हेही वाचा: मुंबईत लसीकरणात ज्येष्ठ पिछाडीवर

राज्यात 2 टक्के रुग्ण व्हेंटीलेटरवर

4 ऑक्टोबर या दिवशी आढळलेल्या एकूण 33,637 सक्रिय रुग्णांपैकी 2.74 टक्के म्हणजेच 922 एवढे रुग्ण व्हेंटीलेटर आहेत. तर, जवळपास 6.54 टक्के आयसीयू मधील रुग्ण असून 2,205 एवढे आहेत. तर, 5,454 गंभीर रुग्ण असून याचे प्रमाण 16.21 टक्के आहे. तर, 56 टक्क्यांहून अधिक लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत.

मुंबईत आठवड्याला 100 सक्रिय रुग्ण

पालिकेचे अतिरिक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दर बुधवारचा आलेख पाहिला तर बुधवारी जास्त रुग्ण असतात. सोमवारी, मंगळवारी रुग्ण संख्या कमी असते. आता मंदिरे उघडलेली आहेत आणि कोविड निर्बंधांचे पालन न केल्यास तर संसर्ग वाढण्याची भीती आहे. आठवड्याला मुंबईत 100 सक्रिय रुग्ण वाढत आहेत. यावर निरीक्षण सुरू आहे.

loading image
go to top