esakal | कुंभमेळ्यावरुन मुंबईत येणाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणार - मुंबई महापौर
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar

कुंभमेळ्यावरुन मुंबईत येणाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणार - मुंबई महापौर

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "कुंभमेळ्याला जाऊन मुंबईत परत येणार असाल, तर मुंबईत विलगीकरणात रहावं लागेल. विलगीकरणात राहण्याचा खर्च राज्य सरकार किंवा महापालिका उचलणार नाही. तो खर्च भाविकांना स्वत: करावा लागेल" असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.

हेही वाचा: महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राज ठाकरे यांना हात जोडून विनंती

"कुंभमेळ्यावरुन येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाइन करावं लागेल. कुंभमेळ्यावरुन येणाऱ्यांना ओळखायचं कसं? हा प्रश्न आहे. त्यामुळे उगाचच दुसऱ्या राज्यातून ये-जा करु नका. तुम्हाला विलगीकरणात रहावं लागेल. रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत सोडणार नाही. लोकांनी आपल्या कुटुंबाचा स्वत:चा जीव वाचवावा" असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं.

निरंजनी आखाड्याने महाकुंभाचा शनिवारी शेवट करण्याचा निर्णय घेतला असून या आखाड्याच्या १७ संतांसह ५० पेक्षा जास्त संतांना कोरोना झाला आहे. अजून २०० संतांच्‍या चाचणीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. यावर आता पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंतर गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंतही मोदींनी केली आहे. हरिद्वारमध्ये सुरु असलेला कुंभमेळा आता कोरोना विषाणूसाठीचा हॉटस्पॉट बनला आहे.

loading image