esakal | 'आकाशवीणा' पुस्तकाचे प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

'आकाशवीणा' पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ग्रंथालीतर्फे प्रकाशित 'आकाशवीणा' ('Akashveena') या वीणा आशुतोष रारावीकर लिखित पुस्तकाचे नुकतेच एका आभासी समारंभात प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे (Dr. Dnyaneshwar) यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. प्रकाशन समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, कोकण मराठी साहित्य परिषद (ठाणे) (Thane) अध्यक्षा मेघना साने, प्रसिद्ध लेखिका प्रा. वृंदा भार्गवे (Vrinda Bhargave) आणि रेडिओ विश्वासचे संचालक डॉ.हरिभाऊ कुलकर्णी (Dr. Haribhau Kulkarni) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मधुरा वेलणकर साटम म्हणाल्या, 'मनाचा ठाव घेत वेगळा दृष्टिकोन देणारे, संवाद साधताना विचार देणारे हे पुस्तक आहे.

'मेघना साने म्हणाल्या, 'समृद्ध अनुभवविश्व असलेल्या लेखिकेची ही सकारात्मक अशी अंतर्मुख करणारी साहित्यकृती आहे. दिनविशेष दिनमाहात्म्य, नवरात्री अशा विविधांगी विषयांना पुस्तकात नवीन कोंदणात बसवण्यात आलेले आहे, असे वृंदा भार्गवे म्हणाल्या. हरिभाऊ कुलकर्णी म्हणाले, की मातीशी नाळ जुळलेल्या एका संवेदनशील लेखिकेने रेडिओवरील आपल्या कार्यक्रमांचे पुस्तकात रूपांतर करण्याचे दुर्मिळ कार्य केले आहे. ज्येष्ठ कवी व गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या 'वीणाच्या वेणीत यशपुष्प' या अभिप्रायाचेही अभिवाचन झाले. वीणा रारावीकर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, शब्दसूरांनी 'वीणेच्या झंकाररूपी वाचकांशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे.'

हेही वाचा: शिर्डीत विश्वस्त निवडीसाठी सरकारने घेतला पंधरा दिवसांचा अवधी

'ग्रंथाली' तर्फे विश्वस्त धनंजय गांगल आणि धनश्री धारप यांची भाषणे झाली. मृण्मयी भजक यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

loading image
go to top