esakal | परदेशातून आलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा लागणार शोध
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परदेशातून आलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा लागणार शोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नुकतेच जिनोम सिक्वेसिंगच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नमुने घेण्यात आले. परदेशातून आलेल्या नागरिकांचे नमुने हे यावेळच्या जिनोम सिक्वेसिंगचे वैशिष्ट्य आहे. यातून नव्या विषाणूचा प्रकार समजून घेण्यास मदत होईल. या जिनोम सिक्वेसिंगच्या तिसऱ्या टप्प्याचा अहवाल बुधवारी अपेक्षित असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.  

सुरेश काकाणी यांनी सांगितले की, शनिवारी जिनोम सिक्वेसिंगचे तिसऱ्या टप्प्यातील 376 नमुने मशीनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या मशीनमध्ये एका वेळी 384 नमुने तपासण्याची क्षमता असून आता पर्यंत 375 किवा 374 असे नमुने तपासण्या आले आहेत. यावेळच्या जिनोम सिक्वेसिंगचा अहवाल आगामी दोन ते तीन दिवसात येण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत हा अहवाल येणे अपेक्षित असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले. या अहवालामुळे नवीन विषाणू कोणत्या प्रकारचा आहे याची माहिती मिळू शकते.  

त्यातही डेल्टा कि डेल्टा प्लस कि अन्य कुठला विषाणू असल्यास त्यानुसार पालिका आपल्या धोरणात बदल करणार असल्याचे काकाणी म्हणाले. दरम्यान कोरोना व्हेरियंट बदलला कि उपचार उपाययोजनेतील धोरण देखील बदलावे लागते. तिसऱ्या जिनोम सिक्वेसिंगमध्ये परदेशी नागरिकांचे नमुने असल्याने विमानतळावरील टेस्ट मध्ये पॉझिटीव्ह असलेले नमुने या जिनोम सिक्वेसिंगमध्ये आहेत. कोरोनाचे कोणते नवीन रूप परदेशातून आणि विविध राज्यांतून मुंबईत आले आहे? ते बुधवारी आढळू शकते.

कोरोनाची नवीन रूपे शोधण्यासाठी, पालिका त्या रुग्णांचे जीनोम सिक्वेंसींग करते जे दीर्घकाळापासून कोरोना ग्रस्त आहेत, जेथे अधिक रुग्ण सापडत आहेत, जे आयसीयूमध्ये दीर्घकाळ दाखल आहेत आणि ज्यांचा इतिहास परदेशी दौऱ्यांचा असतो.

loading image
go to top