esakal | राज्य सरकार सणांविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राज्य सरकार सणांविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्य सरकार (State Goverment) हे कोणत्याही सणांविरुद्ध (Festival) नाही; तर कोरोनाच्या (Corona) विरोधात आहे. कोरोनाला (Corona) अटकाव घालण्यासाठी जगभरात जे नियम सांगितले आहेत, त्यांचे पालन करावेच लागेल, असे सांगून मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज स्पष्ट केले, की केंद्रानेदेखील सणांदरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.

त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: दिव्यात भाजपकडून काळ्या फीत बांधून प्रतिकात्मक दहीहंडी उत्सव साजरा

दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही. काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत, हे खुप दुर्दैवी आहे. नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोनाविरुद्ध करा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आमदार सरनाईक कोरोनाविरोधात जे आंदोलन करत आहेत, तसे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी कोरोना लढाईत ठाणेकरांनी केलेले काम मार्गदर्शक असल्याचे या वेळी सांगितले.

हेही वाचा: शिफारशी झेडपी सदस्यांच्या, श्रेय आमदारांचे; जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे गोंधळ

तिसरी लाट रोखण्यासाठी...

जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत, असे सांगून संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केले.

loading image
go to top