esakal | सोमवारी पालघरमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सोमवारी पालघरमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : लखीमपूर येथील घटनेचा निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पालघर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर, वसई तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा ताफा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने बंदमध्ये सहभाग घेतला. सकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वसई पश्चिम येथील पंचवटी मागांवर येत त्यांनी मोदी सरकार हाय हाय'च्या घोषणा देत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद;काँग्रेस, राष्ट्रवादीचा सहभाग

औद्योगिक वसाहत बंद

वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदारांनी महाराष्ट्र बंदचा धसका घेत सोमवारी कंपन्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदल्या दिवशीच कामगारांना कळवले होते. त्यामुळे सोमवारी अनेक कंपन्या बंद होत्या. रस्त्यांवर वाहनाची गर्दी तुरळक प्रमाणात दिसून आली.

loading image
go to top