esakal | नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; काँग्रेस, राष्ट्रवादीचा सहभाग|Nanded News
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi Call Band In Nanded

नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद;काँग्रेस, राष्ट्रवादीचा सहभाग

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचे (Maharashtra Bandh) सोमवारी (ता. ११) आवाहन करण्यात आले होते. या बंदला नांदेडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर अनेक दुकाने, प्रतिष्ठाने सुरू झाली होती. महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमुळे नांदेडला (Nanded) पहिल्यांदा काँग्रेस (Congress Party), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र पाहायला मिळाले. नांदेड शहरातील विविध भागातून फेरी काढून जनतेला महाराष्ट्र बंदच्या आवाहनास सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. काही ठिकाणी दुकाने बंद करण्याचा आग्रह करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस विभागाच्या वतीने चौकाचौकात आणि महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा: औरंगाबादेत गळा चिरुन प्राध्यापकाचा निर्घृण खून

यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, तालुकाध्यक्ष निलेश पावडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, शहरप्रमुख सचिन किसवे, तुलजेश यादव, अशोक उमरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीहराराव भोसीकर, धनंजय सूर्यवंशी, राऊफ जमीनदार, कन्हैया कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा: दारु खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा खून, औरंगाबादच्या सिडकोतील घटना

loading image
go to top