esakal | विक्रोळीच्या सक्षम महिला मंडळाच्या महिलांनी साधला फेरीवाल्यांशी संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विक्रोळीच्या सक्षम महिला मंडळाच्या महिलांनी साधला फेरीवाल्यांशी संवाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : दोन दिवसांपूर्वी ठाणे (Thane) महानगरपालिकेच्या (Municipal) हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्या विरोधात कारवाई करण्यास गेलेल्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला करून बोटे छाटल्याची घटना घडली होती. फेरीवाल्याच्या या कृतीबाबत सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आज विक्रोळीतील सक्षम महिला मंडळाच्या महिलांनी विक्रोळीतील फेरीवाल्याशी संवाद साधत ठाणे (Thane) हद्दीत घडलेला प्रकार विक्रोळीत (Vikroli) घडू देणार नाही तसा प्रकार घडलाच यर त्यांना सक्षम पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा सक्षम महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजा दळवी (Pooja Dalvi) यांनी फेरीवाल्याना दिला. महिला मंडळाच्या

हेही वाचा: राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार ‘सीईटी’साठी अर्ज

सक्षम महिला मंडळाच्या महिलांनी विक्रोळीतील फेरीवाल्याना भेटून त्यांच्याशी संवाद केला. महाराष्ट्रात उद्योगधंदा करण्यासाठी आला असाल तर फक्त उद्योग सांभाळा दहशत करून काही करणार असाल तर त्याला सक्षम उत्तर देऊ. यावेळी त्यांनी काही फेरीवाले व फेरीवाले संघटना यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असेही आश्वासन दिले.

loading image
go to top