कांजूरमार्गमध्ये लवकरच उभे राहणार नाट्यगृह 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मुंबईच्या विकास आराखड्यातील तरतुदीनुसार कांजूरमार्ग येथील आरक्षित भूखंडावर नाट्यगृह बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई ः मुंबईच्या विकास आराखड्यातील तरतुदीनुसार कांजूरमार्ग येथील आरक्षित भूखंडावर नाट्यगृह बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही जागा खासगी मालकीची असल्याने पालिकेकडून त्याचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली.

या नाट्यगृहाचा लाभ कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि पवई येथील नाट्यरसिकांना होणार आहे. पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जवळपास नाट्यगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे मुंबईच्या विकास आराखड्यात कांजूरगाव येथील जमीन नाट्यगृहासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांनी ही जमीन नाट्यगृहासाठी संपादित करावी, अशी मागणी केली होती.

या मागणीवर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे.ही जमीन खाजगी मालकीच्या असल्याने पालिकेला भूसंपादन करुन ताब्यात घ्यावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The theater will soon be standing on the Kanjur Marg