लॉकडाऊनमध्ये चोरटे झाले सक्रीय! नवी मुंबईतील व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 12 April 2020

  • घणसोलीत घरफोडी
  • लाॅकडाऊनमध्य चोरटे पुन्हा सक्रिय

नवी मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे सामसुम असल्याची संधी साधुन चोरटयानी घरफोडया करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे. चोरट्यांनी रविवारी (ता.१२) पहाटे घणसोलीतील 3 दुकानांचे शटर तोडून दुकानातील हजारो रुपयांच्या रोख रक्कमेसह किंमती ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चोरटे दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून रबाळे पोलिसांनी फुटेजवरुन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

मागील 21 मार्च पासून सर्वच परिसरातील अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने सध्या बंद आहेत. याचाच फायदा उचलत काही चोरट्यांनी बंद दुकानांचे शटर तोडून चोरी केली. यामध्ये दोन मेडीकलची दुकाने तसेच एक किराणा मालाचे दुकानांचा समावेश आहे.

theft activated in the lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft activated in the lockdown