हॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम लांबवणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या रॅकेटमधील दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी ॲक्‍टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

रविकुमार यादव आणि अमितकुमार यादव अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. हॉटेलमध्‍ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी डेबिट कार्डने बिल अदा केल्यानंतर तेच एटीएम कार्ड ते आपल्या स्टीमर मशीनमध्येही स्वाईप करून त्याचा पासवर्ड मिळवायचे. ते स्टीमर मशीनमध्ये ग्राहकाच्या एटीएमचा संपूर्ण डेटा मिळवायचे.

वेटरला कमिशन
बिहारमध्ये एटीएम स्टीमर मशीन बनवून ती वसई, विरारसह मुंबई आणि परिसरातील बिहारी वेटरकडे दिल्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढल्यानंतर १५ ते २० टक्के कमिशन या वेटरला मिळत होते. त्याच्या बदल्यात हे वेटर काम करत असल्याचे उघड झाले.

Web Title: Theft of Debit Card Data in Hotel