विश्वासू वाहनचालकानेच लावला 12 लाखाचा चुना; पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 जानेवारी 2020

मुंबई : मालाड येथील मिठाईवाल्याच्या विश्‍वासू वाहनचालकानेच साथीदाराच्या साह्याने मिठाई विक्रेत्याला 12 लाखांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीची रक्कम जप्त केली. 

महत्वाचं - राज्यातील अनधिकृत स्कूल व्हॅन बस आरटीओच्या रडारवर

मुंबई : मालाड येथील मिठाईवाल्याच्या विश्‍वासू वाहनचालकानेच साथीदाराच्या साह्याने मिठाई विक्रेत्याला 12 लाखांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीची रक्कम जप्त केली. 

महत्वाचं - राज्यातील अनधिकृत स्कूल व्हॅन बस आरटीओच्या रडारवर

प्रदीप संनगले (वय 30), प्रमोद बागवे (35) आणि सुमित दिघे (41) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मालाड येथील मिठाई विक्रेत्याकडे आरोपी प्रदीप 10 वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करीत होता. तो दुकानात जमलेली रक्कम मालकाकडे पोहोच करण्याचे काम करत असे. विक्रेत्याचा त्याच्यावर विश्‍वास बसल्याने प्रदीपवर आर्थिक व्यवहाराची जबाबदारी दिली जायची; मात्र सतत येणारी मोठी रक्कम पाहून प्रदीपने दोघा साथीदारांच्या मदतीने मालकाची रक्कम चोरण्याचा कट रचला. प्रदीप दुकानातून 12 लाख रुपये घेऊन मालकाला देण्यासाठी कारने मालाडमधून निघाला; मात्र ठरल्याप्रमाणे ती रक्कम मालकाला न देता, त्याने दहिसर चेकनाक्‍याजवळ आपल्या दोन साथीदारांकडे दिली. त्यानंतर पान खाण्यासाठी उतरलो असताना पैसे चोरीला गेल्याचा बनाव त्याने केला.

नवी मुंबईत चालत होता हा गोरख धंदा ; 20 कोटीचे मेफेड्रॉन जप्त

मिठाई विक्रेत्याने प्रदीपला कांदिवली पोलिस ठाण्यात नेले आणि चोरीची तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान चालकाच्या मोबाईल फोनमध्ये दोन क्रमांक सापडले. त्यावर दूरध्वनी करून पोलिसांनी आपण वाहनचालक प्रदीप असल्याचे भासवत त्याच्या साथीदारांना पैशांबाबत विचारणा केली आणि त्यांना दहिसर चेकनाक्‍याजवळ बोलावले. त्यानुसार कांदिवली पोलिस दहिसर चेकनाक्‍याजवळ पोहोचले. त्या वेळी तिथे आलेल्या चालकाच्या दोन साथीदारांना रोकडसह पोलिसांनी अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft by own driver in mumbai