मुंबईतील सर्वात जास्त डेंजर हॉट स्पॉट अवघ्या २ दिवसात ६ वरून ८ वर, वाचा कुठे किती रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

शहरातील दोन हजार पेक्षा जास्त रुग्णांच्या प्रभागांची संख्या अवघ्या दोन दिवसात 6 वरुन 8 वर पोहचली आहे.

मुंबई : शहरातील दोन हजार पेक्षा जास्त रुग्णांच्या प्रभागांची संख्या अवघ्या दोन दिवसात 6 वरुन 8 वर पोहचली आहे. यात वरळी परीसरासह अंधेरी, जोगेश्‍वरी पुर्वेकडील भागाचा नव्याने समावेश झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 16 दिवसाचा झाला असून 6 प्रभागांमधे हा कालावधी 20 दिवसांचा आहे. तर आता पर्यंत 43 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान दोन दिवसात रुग्णवाढीचा दर  5.17 टक्‍क्‍यांवरून 4.52 टक्‍क्‍यांवर आला आहे. उपनगरातील काही प्रमाणात रुग्णवाढीचा वेग मुंबई पेक्षा जवळ जवळ दुप्पट आहे.

मुंबईतील कोविड रुग्णांच्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. खासकरुन भायखळा, वरळी, धारावी, अंधेरी पश्‍चिम, कुर्ला या हॉटस्पॉटमधील रुग्ण वाढीचा वेगावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला यश आले आहे. या भागातील रुग्णवाढीचा वेग हा मुंबईच्या सरासरी पेक्षाही कमी आहे. तर, वरळी प्रभादेवी म्हणजे जी दक्षिण प्रभागात 2.9 टक्‍क्‍यांनी रुग्णांची वाढत होत आहे. हा मुंबईतील सर्वात कमी रुग्णवाढीचा दर आहे. दहिसरमध्ये शहरातील सर्वात कमी म्हणजे 389 रुग्ण आढळले आहे. मात्र, येथील रुग्णवाढीचा दर सध्याच्या परीस्थीतीत सर्वाधिक म्हणजे 8 टक्के आहे.

मोठी बातमी - रिपोर्ट येण्याआधीच डॉक्टरांनी मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात आणि फुटला कोरोना बॉम्ब...

लक्ष होते 20 दिवसांचे 

मे महिन्या अखेरपर्यंत संपुर्ण मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 20 दिवसांपर्यंत पालिकेला आणायचा होताा. हा 13 दिवसांवरुन 16 दिवसांवर पोहचला आहे. ई, जी दक्षिण, जी उत्तर, एम पुर्व या हॉटस्पॉटसह एच पुर्व, एच उत्तर या प्रभागात हा कालावधी 20 दिवसांचा आहे. तर डि विभाग 19 दिवस, ए विभाग आणि एल विभाग 17 दिवस, के/पश्चिम विभाग 18 दिवस, बी विभाग 16  दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे.

रुग्ण बरे होण्याचे वाढलेले प्रमाण आणि संक्रमणाचा कालावधी वाढणे या दोन्ही कामगिरीबद्दल आयुक्त इक्बाल सिंह  चहल यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच, मुंबईतील कोरोना मृत्यूदर  यापूर्वीच नियंत्रणात आला आहे. सध्या तो ३.२ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी

 • 17 एप्रिल 8.3 दिवस 
 • 17 मे 14.5 दिवस
 • 30 मे 16 दिवस 

मोठी बातमी - मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महापालिकेचा मोठा निर्णय, युद्धपातळीवर सुरु केलंय काम....

2 हजार पेक्षा जास्त रुग्ण असलेले विभागा

 • जी उत्तर (वरळी प्रभादेवी)- 2900
 • ई (भायखळा माझगाव ) - 2528
 • एफ उत्तर (दादर माटूंगा पुर्व शिव ) - 2517
 • एल (कुर्ला )- 2495
 • एच पुर्व (वांद्रे सांताक्रुझ पुर्व )- 2221
 • के पश्‍चिम (विलेपार्ले ,अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम) - 2210
 • के पुर्व (विलेपार्ले,अधेरी ते जोगेश्‍वरी पुर्व ) 2107
 • जी दक्षिण (दादर पश्‍चिम माहिम धारावी) 2008

1 हजार पेक्षा जास्त रुग्ण

 • एफ दक्षिण (लालबाग परळ ) -1816
 • एम पुर्व (देवनार,गोवंडी मानखुर्द ) -1814
 • एन (घाटकोपर) - 1676
 • एस (विक्रोळी ते भांडूप )1461
 • एम पश्‍चिम (चेंबूर) 1268
 • पी ऊत्तर (मालाड ) --1239
 • डी (ग्रॅन्टरोड,मलबारहिल ताडदेव)-1128

1 हजार पेक्षा कमी रुग्ण

 • पी दक्षिण (गोरेगाव) 968
 • ए ( कुलाबा) 944
 • एच पश्‍चिम (वांद्रे खार पश्‍चिम )-908
 • आर दक्षिण (कांदिवली )875
 • आर मध्य (बोरिवली) -776
 • टी मुलूंड (709)
 • बी (काळबादेवी) - 484
 • सी (गिरगाव) -412
 • आर उत्तर (दहिसर ) - 389

मोठी बातमी - अलिबाग हदरलं! चार नवे कोरोनाबाधित, जिल्हा रुग्णालयातील 2 वार्डबॉयचा समावेश

रुग्ण वाढीचा वेग

प्रभाग - 29 मे - 27 मे

 • ए - 4.1--- 4.4
 • बी - 4.5--4.4
 • सी-6.2--6.9
 • डी-3.7--4.7
 • ई-3.1--4.00
 • एफ उत्तर -3.1--3.6
 • एफ दक्षिण -5.5---6.5
 • जी उत्तर - 3.2--3.6
 • जी दक्षिण - 2.9--3.1
 • एच पुर्व -3.4--4.9
 • एच पश्‍चिम - 5.1--5.6
 • के पुर्व - 5.5---6.00
 • के पश्‍चिम - 3.9--4.00
 • एल - 4.1 ---5.2
 • एम पुर्व - 3.5--3.9
 • एम पश्‍चिम - 5.3--5.6
 • एन - 7.5--9.6
 • पी उत्तर - 7.3---8.5
 • पी दक्षिण - 5.1---6.00
 • आर मध्य - 7.2--8.2
 • आर उत्तर - 8.00---7.1
 • आर दक्षिण - 6.4--7.4
 • एस - 7.8--8.3
 • टी - 5.5---5.7

wards in mumbai with more than 2000 patients increased from 6 to 8 within 2 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wards in mumbai with more than 2000 patients increased from 6 to 8 within 2 days