

Mumbai Local RPF GRP Vacancy
ESakal
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अत्यंत मर्यादित मनुष्यबळ असल्याने या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या अंदाजे ७५ लाख प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत आहे. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफ आणि जीआरपीला कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेचा सामना करावा लागत आहे. दोन्ही दलांमध्ये मिळून एकूण २,५५९ पदे रिक्त आहेत. आरपीएफचे प्रत्येक चौथे पद रिक्त असून, त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड दबाव येत आहे, यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.