
ठाणे महानगरपालिकेत कामाच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता आढळून आली आहे. सरकारच्या स्पष्ट आदेशांना केराची टोपली दाखवत अधिकाऱ्यांनी टेंडर कालावधीत फेरफार केल्याचे उघड झाले आहे. विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी ही पद्धतशीर मोडतोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. वर्तक नगर, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर प्रभाग समित्यांचे अधिकारी या प्रकरणात अग्रस्थानी असल्याचा आरोपदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.