
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर भाष्य करताना शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर त्याची तक्रार करण्याची गरज नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्याही माणसाला घराची ओढ असते, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदी-शहांवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, साधारणतः केंद्राची सत्ता हातात असण्याचे परिणाम काही राज्यांसाठी अनुकूल होत असतात. त्याप्रमाणं जर गुजरातला याचा फायदा मिळाला तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा तिथले आहेत, हे मोठे लोक आहेत त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. त्यामुळं त्यांनी थोड जास्त लक्ष त्यांनी गुजरातकडं दिलं तर आपण समजू शकतो.
कुठल्याही माणसाला घराची ओढ असते
तुम्ही जर मोदींचे दौरे पाहिले तर ते जास्तीत जास्त कुठल्या राज्यात जातात याचं दोन-तीन महिन्यांचं रेकॉर्ड काढलं तर तुम्हाला ते कळेलच. सहाजिकचं आहे की कुठल्याही माणसाला घराची ओढ असते, अशा शब्दांत पवारांनी मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.