खारघर येथे रस्त्याला नदीचे रूप !

गजानन चव्हाण 
सोमवार, 25 जून 2018

दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा पाणी रस्त्यावरून धो धो वाहत असल्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.

खारघर - तळोजा टेकडीतून झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे जेलकडून खुटूकबांधनकडे जाणाऱ्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.
           
खारघर वसाहतीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सिडकोने सेन्ट्रल पार्क आणि तळोजा जेल मार्गे तळोजाकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. तसेच या रस्त्यावर नियमित वाहनाची वर्दळ असते. ओवा डोंगराचे पाणी वाहून नेण्यासाठी सिडकोने रस्त्याचा कडेला गटाराचे काम करणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आणि दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा पाणी रस्त्यावरून धो धो वाहत असल्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावरून जे जा करणाऱ्या तळोजा कारागृहातील कर्मचारी,महिला आणि शालेय  मुलामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे दुचाकी चालक सांभळून वाहन चालविताना दिसून आले. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is plenty of water on the road at Kharghar

टॅग्स